रहाटणी ; चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची अनेक प्रदेशातील नेत्यांच्या उपस्थितीत भव्य सभा रहाटणी येथे पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते भास्कर जाधव, माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सुभान अली शेख, आमदार सुनिल आण्णा शेळके, या दिग्गज नेत्यांच्या भाषणांनी चिंचवड पोट निवडणुकीचे वातावरण तापवले.
आजच्या सभेने अतिशय वेगवान आणि नियोजनबध्द रीतीने सुरू असलेल्या आपल्या प्रचाराला एक सकारात्मक वळण मिळाले आहे. या सभेनंतर निश्चितपणे आपण चिंचवडकरांचा विश्वास अजून मोठ्या प्रमाणावर संपादन करत विजय प्राप्त करू हा विश्वास भक्कम झाला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते भास्कर जाधव, माजी मंत्री धनंजय मुंडे, सुभान अली शेख, आमदार सुनिल आण्णा शेळके, माजी आमदार विलास लांडे पाटील, रोहित आर. पाटील, संजोग वाघेरे पाटील, भाऊसाहेब भोईर, सारंग पाटील, महंमद चाचा पानसरे, अजित गव्हाणे, सचिन भोसले, प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, रविकांत वरपे, प्रभाकर वाघेरे, कविता आल्हाट, शीतल हगवणे, सायली नढे, शमीमताई पठाण, शाम लांडे, फजल शेख, विनायक रणसुभे, राहुल भोसले, धनंजय भालेकर, संजय उदावंत, इम्रान शेख, तुषार कामठे, यश साने, दीपक साकोरे, वर्षा जगताप, अनुराधा गोफणे, उषा काळे, स्वाती काटे, निकिता कदम, शीतल काटे, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा शीलवंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




