पिंपरी ; मोदी यांच्या कारकिर्दीतच सर्वात जास्त हिंदु असुरक्षीत असल्याचे दिसून येत आहे. या देशातील हिंदूंना सुरक्षित वाटत नसल्याने मोदी यांच्या कारकीर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही मोर्चे काढावे लागत असतील तर भारतीय जनता पक्षाने राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना केले काय केले याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. राज्यघटना, संविधान भाजपने अडचणीत आणले असून त्यांनी राज्याची आणि देशाची राजकीय संस्कृती आणि वैचारिक परंपरा धुळीला मिळविण्याचे काम केले आहे. लोकशाही वाचावी, घटनेचे रक्षण व्हावे, अशी विचारधारा असणाऱ्या नागरिक चिंताक्रांत बनले आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या संरक्षणासाठी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत नाना काटे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून त्याची सुरुवात करा, असे आवाहन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुभान अली शेख यांच्या सभेचे रहाटणी येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नाना काटे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादीचे निरीक्षक व मावळचे आमदार सुनील शेळके, युवा नेते रोहित आर.आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकचे प्रदेश सचिव सुभान अली शेख, सारंग श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेस माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, उपशहरप्रमुख रोमी संधू, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रविकांत वरपे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका शीतल नाना काटे, लताताई ओव्हाळ, सुलक्षणा धर, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक मयुर कलाटे, तुषार कामठे, विक्रांत लांडे, शंकर काटे, राजू लोखंडे, राजू मिसाळ, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, शाम लांडे, फझल शेख, संतोष कोकणे, विनोद नढे, राहुल भोसले, गोरक्ष लोखंडे, खंडूशेठ कोकणे, माई काटे, उषा काळे, संगीता ताम्हाणे, राजेंद्र जगताप, शमीम पठाण, पुणे शहर महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा वर्षा जगताप, युवक अध्यक्ष इम्रान शेख, सेवादलाचे अध्यक्ष महेश झपके, प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, युवा नेते शाम जगताप, पिंटू जवळकर, विशाल पवार, प्रशांत दिलीप सपकाळ, सागर कोकणे, कविता खराडे, मनीषा गटकळ, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय अवसरमल, संदीप पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष यश साने आदी उपस्थित होते. सभेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.




