चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना आज विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी चिंचवड विधानसभेत जोरदार प्रचार रॅलीसाठी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. यात वेताळनगर चिंचवड येथील नागरिक रात्री दहानंतर ही आपल्या नेत्याची वाट पाहत रस्त्यावर उतरले होते. निवडणुकीच्या नियमांना अनुसरून अजितदादा बरोबर दहा वाजता रॅली मधून खाली उतरले. मात्र सामान्य जनता आपली वाट पाहतेय… शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर वाट पाहत थांबलेत त्यांना भेटायचे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यानंतर त्यांनी निवडक कार्यकर्त्यांसह थेट वेताळनगर गाठले आणि तेथील शिवसेनेच्या शाखेत जाऊन बसले.
अजितदादांचे आणि आपल्या लाडके उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे जोरदार स्वागत वेतननगर मधील नागरिकांनी केले. तेथील शिवसेनेच्या शाखेत अनेक नागरिकांशी व शिवसैनिकांशी मनमुराद गप्पा मारून शुभेच्छा स्वीकारल्या. काही वेळानंतर शिवसेनेच्या शाखेतून बाहेर पडताना नागरिकांनी “एकच दादा अजित दादा”… “नाना काटे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रात्रीच्या साडेदहा वाजले तरी नागरिक आपल्या नेत्याला भेटण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
यावेळी अजित पवार यांच्या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, आमदार अमोल मिटकरी, आमदार सुनील आण्णा शेळके, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, संतोष सौदनकर, शमीम पठाण यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




