पिंपरी, ता. २१ : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मतदारसंघाच्या विविध भागातील फेरीवाले, दुकानदार, किरकोळ व्यावसायिक आदींना कलाटे यांच्या प्रचार पत्रकांचे वाटप केले. तसेच मतदानाच्या दिवशी (ता. २६) मतदान यंत्रावरील शिट्टीचे बटण दाबून राहुल कलाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन कार्यकर्ते करीत होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना स्लीपाही वाटल्या. भर उन्हामध्ये नागरिकही थांबून कार्यकर्ते करीत असलेले आवाहन ऐकत होते. सकाळपासूनच कार्यकर्ते प्रचारासाठी बाहेर पडले होते. भाजी विक्रेते, फळविक्रेते, छोटे- मोठे व्यावसायिक यांच्या भेटी-गाठी घेत या सर्वांना मतदान यंत्रावरील शिट्टीचे बटण दाबण्याचे आवाहन कार्यकर्ते संबंधित व्यावसायिकांना करीत होते.
काहीजण एकमेकांमध्ये राहुल कलाटे यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा करताना कोपऱ्या- कोपऱ्यावर दिसत होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी राहुल कलाटे यांचे छायाचित्र असलेली टोपी टी-शर्ट अंगात घातले होते. काही फेरीविक्रेत्यांना मतदानाविषयी माहिती नव्हती, अशा लोकांना माहिती देण्याचे काम कार्यकर्ते करीत होते. राहुल कलाटे यांनी केलेल्या विकासकामांची पावती आमदारकीच्या रूपाने त्यांना मिळण्याची वेळ आता आल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
राहुल कलाटे यांच्या प्रचारपत्रकांचे घरोघरी वाटप करण्यात आले. सकाळपासूनच मतदारसंघाच्या विविध भागात युवक-युवतींनी कामाला सुरुवात केली. कार्यकर्ते नागरिकांना कलाटे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत होते. नागरिकही प्रचारपत्रकातील विविध विकासकामांची छायाचित्रांसह दिलेली माहिती आवर्जून वाचताना दिसत होते.
यावेळी रविवारी (ता. २६) शिट्टीचे बटण दाबून राहुल कलाटे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहनही तरुण-तरुणी करीत होते. काही यवक-युवतींनी मतदारांना स्लीपा वाटल्या. त्याचप्रमाणे ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातुनही आक्रमक प्रचार करण्यात आला. राहुल कलाटे यांचे छायाचित्र आणि शिट्टीचे चित्र असलेले टी-शर्ट आणि टोपी घालण्याची तरुणाईमध्ये ‘क्रेझ’ होती




