चिखली : मागील काही दिवसापासून चिखली परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात विकासाने आक्रमक झाले असून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावरती नागरिकांचा हंडा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. चिखलीमधील पाणीपुरवठा विभागाचे जुने कर्मचारी काढून टाकल्याने पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराने चिखली कर त्रस्त झाले आहेत.
याविषयी बोलताना विकास साने म्हणाले, दुर्गानगर , पाटील नगर , शेलार वस्ती, चिखली गावठाण यांच्यासह चिखली मधील सर्व रहिवासी सोसायट्या पाणीप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. या परिसरात कमी दाबाने पाणी येणे, अनियमित पाणीपुरवठा यांसारख्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. उन्हाळा तोंडावर असताना , ही बाब अतिशय चिंता जनक आहे.
१०-१५ वर्षे चिखलीसाठी पाणीपुरवठा करणारे कर्मचारी बदल्यामुळे नवीन कर्मचारी यांच्यात समन्वयाचा अभाव होत असल्याने नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यातच चिखलीमधील पाणीप्रश्न अंत्यत बिकट होत आहे. सर्वाधिक महसूल गोळा करून देणाऱ्या उपनगरांमध्ये चिखलीचा प्राधान्याने समावेश होतो. तरी देखील पाण्यासाठी चिखलीकरांना संघर्ष करावा लागत आहे. दीड वर्षांपूर्वी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. आज पुन्हा तीच परिस्थिती आल्याने दुर्दैवाने आम्हाला निद्रिस्त पाणीपुरवठा विभागाला जाग आणण्यासाठी हंडा मोर्चा काढावा lag आहे . आंदोलनानंतर देखील पाणीप्रश्न सुरळीत न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल
याप्रसंगी , बहुसंख्येने महिला , नागरिक , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आदी उपस्थित होते .




