पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मतदान केंद्रा जवळील १०० मीटर परिसरातील सर्व स्थापन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवार दिनांक 26 फेब्रुवारी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, टपऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे.
त्याचबरोबर मतदान केंद्र परिसरात हत्यारे बाळगण्यास बंदी आहे हे आदेश रविवारी दिनांक 26 फेब्रुवारी मध्यरात्री 12 पासून सायंकाळी सात पर्यंत लागू राहतील मतदान प्रक्रिया शांतता व सुरळीत भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस यांनी विविध प्रतिबंधक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चिंचवड, सांगवी, वाकड, हिंजवडी, रावेत, देहूरोड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील अत्यावश्यक सर्व सेवा वगळता दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




