पिंपळे सौदागर : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीसाठी आज सकाळी ७ पासून मतदान (Voting) प्रक्रिया सुरु झाली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी पेटी पूजन करून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाड़ीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनैशनल स्कूल या पोलिंग सेंटरवर त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.
चिंचवड निवडणुकीत मतदारसंघात इतर चार मतदारसंघात आज निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. सायं ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. मतदान केंद्रावर अधिकारी आणि पोलीस यंत्रणांच्या मदतीने निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




