पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आपल्या कुटुंबीयांसमवेत वाकड येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
यावेळी राहुल कलाटे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका कमल कलाटे , पत्नी वृषाली कलाटे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.




