पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील मतदान केंद्रात बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीनल यादव यांनी केला आहे.
मीनल यादव म्हणाल्या, पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील मतदार केंद्रात मी गेले होते. तिथे चार ते पाच जणांचे बोगस मतदान झाले. ज्यांचे बोगस मतदान झाले, ते माझे पाहुणे होते. मतदान केंद्रात गेल्यावर त्यांनी मतदार स्लिप दिली. तेव्हा कळले की त्यांच्या नावावर कोणीतरी अगोदरच मतदान केले. मी तिथे गेले असता महापालिकेचे अधिकारी, मतदान केंद्रातील अधिका-यांनी ‘फेस मॅट’चे कळले नसल्याचे तकलादू कारण दिले.
माझ्यासमोरच असे झाले. तर, किती मतदान बोगस होत असेल. येथील ईव्हीएममध्ये देखील बिघाड आहे. पहिल्यांदा बटन दाबल्यानंतर आवाज येत नाही. दुस-यांदा मशिनचे बटन दाबल्यानंतर आवाज येतो. पहिल्यावेळी बटन दाबलेले मत कोणाला पडले? माझ्याडोळ्यासमोर हा प्रकार झाला आहे, असल्याचेही त्या म्हणाल्या.




