पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा संपला. फेरी, दिवशी रॅली, मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेठी नंतर आज मतदान प्रक्रिया संपली. यामध्ये प्रमुख लढत असणारे भाजपच्या उमेदवार अश्विनीताई जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह एकूण २८ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत.
मतदारांची संख्या – २०१९
पुरुष – २,६०,९२७
महिला – २,२३,४२९
एकूण मतदार – ४,८४,३६२
मतदारांची संख्या – २०२३
पुरुष – ३,०२,९४६
महिला – २,६५,९७४
एकूण मतदार – ५,६८,९५४
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत सुरळीत आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले. नवोदित मतदारांसह युवक, युवती, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर मतदारांनी आज आपला मताधिकार बजावला असुन या पोटनिवडणुकीसाठी ५०.४७ टक्के इतके सरासरी मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. विधानसभेच्या तुलनेत पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यामुळे भाजप, महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मतदान प्रक्रियेला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत ३.२५ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११ वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी १०.४५ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २०.६८ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.५५ टक्के एवढी आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४१.०६ टक्के इतकी होती. एकूण झालेल्या अंतिम मतदानाची सरासरी टक्केवारी ५०.४७ टक्के इतकी झाली.
एकुणच संपूर्ण मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. चिंचवड विधानसभा या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार होते. एकूण ५१० मतदार केंद्रावर मतदान संपन्न झाले. यापैकी मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर तसेच यंत्रणेवर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले लक्ष ठेवून होते. या कक्षामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे, निवडणूक सहायक अधिकारी नागेश गायकवाड, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, निवडणूक सहायक अधिकारी प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, समन्वयक सिताराम बहुरे, बेल इलेक्ट्रॉनीक्सचे तज्ज्ञ अधिकारी, डॅशबोर्ड कक्ष समन्वयक अनिता कोटलवार, विजय बोरुडे, नायब तहसीलदार श्वेता आल्हाट, संतोष सोनवणे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी, संगणक चालक कार्यरत होते. मतदान केंद्रावर दिव्यांगांना सहाय्य करण्यासाठी दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी कामकाज पाहिले.
कोणत्याही मतदार केंद्रावर उद्भवलेल्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच मदतीसाठी शीघ्र कृती दलाचे (क्विक रिस्पॉन्स टीम) ७ पथक कार्यरत होते. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्यास शीघ्र कृती दल तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करत होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेला कुठेही बाधा आली नाही. या पथकात निवडणूक विभागाचे कर्मचारी, अधिकारी, बीएलओ तसेच बेल इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अभियंते यांचा सहभाग होता. तर सेक्टर अधिकाऱ्यांकडे मतदान केंद्रनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी




