तळेगाव दाभाडे : पुणे मुंबई लोहमार्गावर बेगडेवाडी गावच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडत असताना एका ४० वर्षीय अज्ञात इसमाचा लोकलची धडक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२६) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली आहे.
देहुरोड लोहमार्ग रेल्वे पोलीस उपनिरीक्षक पी. टी. करदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई लोहमार्गावर भेगडेवाडी गावच्या हद्दीत एका अज्ञात इसमाला लोकलची धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला या इसमाची उंची अंदाजे ५ फूट २ इंच, रंग काळा सावळा नाक बसके हाता पायावर जळालेले जुने व्रण आहे. या इसमाने अंगात पांढऱ्या रंगाचा फुल भायांचा शर्ट, त्यावर निळ्या रंगाचे ठीपके, खाकी रंगाची कॉटन फुल पॅन्ट व पायात काळ्या रंगाची सॅन्डल घातले आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.




