सांगवी : पिंपरी चिंचवड महापालिकेची लिटमल टेस्ट म्हणून पाहिले जाणारे चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये विद्यमान आमदार भाजपला मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवण्यात यश आले. यावेळी केवळ पंधरा दिवसात नाना काटे यांच्या रूपाने महाविकास आघाडीने चुरशीचा सामना रंगला. या प्रभागात चारही भाजपचे नगरसेवक असताना महाविकास आघाडीतील एकजुटीमुळे भाजपला तगडे आव्हान उभे राहिले असल्याचे निकालातून समोर आले आहे.
स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ला राहणाऱ्या पिंपळे गुरव सांगवी परिसरात निधनाची सहानुभूती आणि मतदासंघांत “जगताप पॅटर्न”मुळेच चिंचवडमध्ये भाजपला यश मिळाले. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील फुटीचा थेट फायदा भाजपला झाला आहे. महापालिकेचे निवडणूक कधीही लागू शकते त्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळवण्यासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे असे चित्र दिसते.
वास्तविक, महाविकास आघाडीतील काही माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे ताकद लावली. त्यामुळे अनेक प्रभागात भाजपला मताधिक्य मिळाले तर भाजपचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या अनेक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी लक्षवेधी मतदान घेतले याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेले मतदान महाविकास आघाडी सोबत आले असते तर निकाल वेगळा दिसला असता. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून स्थानिक महाविकास आघाडीतील एकजूट महापालिकेसाठी भाजपला धोक्याची घंटा मानली जात आहे.राज्यात सत्तेवर असणारे भाजप महानगरपालिकेत मूळच्या चार प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे.
२०१७ मधील प्रभाग क्रमांक 32 – सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, कृष्णानगर,पीडब्ल्यूडी, एस.टी कॉलनी
या प्रभागात चारही भाजपचे प्रतिनिधित्व करतात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, सुषमा तनपुरे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. प्रभागाचे एकूण मतदान एकूण ३४ हजार ८७४ मतदान आहे. यामधील पोट निवडणुकीत १७,३०९ लोकांनी मतदान केले. एकूण ४९.६३ % मतदान झाले.
चिंचवड विधानसभा निकाल २००९ ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप (अपक्ष) ७८ हजार ७४१
२) श्रीरंग बारणे (शिवसेना) ७२ हजार १६६
३) भाऊसाहेब भोईर (काँग्रेस) २४ हजार ६८४
२०१४ ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप (भाजप) १ लाख २३ हजार
२) राहुल कलाटे (शिवसेना) ६३ हजार ४८९
३) नाना काटे (राष्ट्रवादी) ४२ हजार ५५३
२०१९ ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप (भाजप) १ लाख ५० हजार
२) राहुल कलाटे (अपक्ष) १ लाख १२ हजार
२०२३ ची पोट निवडणूक
१) अश्विनी जगताप (भाजप) १ लाख ३५ हजार ६०३
२) नाना काटे (राष्ट्रवादी) ९९ हजार ४३५
३) राहुल कलाटे (अपक्ष) ४४ हजार ११२
मागील सर्व विधानसभा निवडणुकीतील मतदारांची आकडेवारी पाहता विधानसभा पोटनिवडणुकीत जुनी सांगवी – जगताप १२०८, काटे -१०२३, कलाटे ३०८, मधुबन कॉलनी जगताप 3048 काटे 2375 कलाटे 624 शितोळेनगर, जुनी सांगवी- जगताप 2762 काटे 2145 तलाठी 604 मतदान घेतले. या भागात मतदानाची आकडेवारी पाहता भाजपच्या उमेदवार अश्विनीताई जगताप यांना ७०१८ मतदान मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ५,५४३ तर अपक्ष राहुल कलाटे यांना १५३६ मतदान मिळाले. सोबत इतर अपक्षांना २५० व नोटा यांना १८९ मतदान झाले.
यामध्ये भाजपला मिळालेल्या मतापेक्षा महाविकास आघाडी मधील विभागलेल्या मतांची बेरीज ६१ मतांनी अधिक आहे. या निवडणुकीत भाजपच्या ७५१८ मतदान असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. त्यामुळे हे मतदान कोणाकडे जाणार आणि महापालिका निवडणुकात महाविकास आघाडी एकत्र येणार का? यावरती महापालिकेतील राजकीय गणिते ठरणार आहेत. त्यामुळे महापालिकेची लिटिल टेस्ट असणाऱ्या पोटनिवडणुकीतून महाविकास आघाडीसाठी भाजप विरोधात विरोधक कोणती व्ह्यू रचना आखतात यावरती महापालिकेची गणिते बरेच अवलंबून राहणार आहेत.




