पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड महापालिकेची लिटमल टेस्ट म्हणून पाहिले जाणारे चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सत्ताधारी भाजपला मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवण्यात यश आले. यावेळी केवळ पंधरा दिवसात नाना काटे यांच्या रूपाने महाविकास आघाडीने चुरशीचा सामना रंगला. पिंपळे गुरव, नवी सांगवी या प्रभागात ७ भाजपचे आणि एक अपक्ष नगरसेवक आहेत. या परिसराने जगताप कुटुंबीयांना भरभरून साथ दिली आणि देत राहणार आहेत. याचाच प्रत्येक स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या नेतनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक सुरुवातीपासून चर्चेची ठरली होती. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार यांच्या लढतीमुळे ही निवडणूक चर्चेची ठरली. स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची सहानुभूती आणि मतदासंघांत “जगताप पॅटर्न”मुळेच चिंचवडमध्ये भाजपला यश मिळाले. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील फुटीचा थेट फायदा भाजपला झाला असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. मतदानाच्या 25 फेऱ्या पूर्ण होईपर्यंत आणि शेवटच्या ९ फेऱ्या राहिल्या असताना अश्विनीताई जगताप केवळ १० हजाराचे मताधिक्याने होते. मात्र, पिंपळे गुरव, सांगवी बालेकिल्ल्यात मतमोजणी सुरू झाल्यानंतर त्यांचे मताधिक्य वाढले. आगदी ते ३६ हजारापर्यंत जावून पोहोचले. महापालिकेचे निवडणूक कधीही लागू शकते त्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळवण्यासाठी हा परिसर वगळता इतर भागात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे असे चित्र दिसते.
वास्तविक, महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप , भाजपचे नगरसेविका यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या चंदा लोखंडे, श्याम जगताप, अरुण पवार, प्रशांत सपकाळ व युवा पदाधिकारी यांनी परिसरात मोठी काम केली. तर या ठिकाणचे अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या पाठीमागे ताकद उभी केली. हा भाग भाजपसाठी बालेकिल्ला असला तरीही चिंचवड विधानसभेच्या अनेक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी लक्षवेधी मतदान घेतले याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मतदाना दिवशी जगताप आणि कलाटे यांचे कार्यकर्ते एकमेकात वादावादी झाली याचा थेट परिणाम जगताप यांच्या बाजूनेच झाल्याचे दिसून आले. यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेले मतदान महाविकास आघाडी सोबत आले असते तर निकाल वेगळा दिसला असता. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून स्थानिक महाविकास आघाडीतील एकजूट महापालिकेसाठी भाजपला धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्यात सत्तेवर असणारे भाजप व शिदे गट महानगरपालिकेत मूळच्या चार प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पास होण्यात यश मिळाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काठावर पास होण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
२०१७ मधील प्रभाग क्रमांक 29 – कल्पतरू इस्टेट, पिंपळे गुरव, गुलमोहोर कॉलनी, सुदर्शननगर
- अ – भाजप – सुनील अंघोळकर
- ब – भाजप – उषा मुंढे
- क – भाजप – शशीकांत कदम
- ड – भाजप – चंदा लोखंडे
- अ – भाजप – अंबरनाथ कांबळे
- ब – भाजप – माधवी राजापुरे
- क – भाजप – सीमा चौगुले
- ड – अपक्ष – नवनाथ जगताप
चिंचवड विधानसभा निकाल २००९ ची निवडणूक
- १) लक्ष्मण जगताप (अपक्ष) ७८ हजार ७४१
- २) श्रीरंग बारणे (शिवसेना) ७२ हजार १६६
- ३) भाऊसाहेब भोईर (काँग्रेस) २४ हजार ६८४
२०१४ ची निवडणूक
- १) लक्ष्मण जगताप (भाजप) १ लाख २३ हजार
- २) राहुल कलाटे (शिवसेना) ६३ हजार ४८९
- ३) नाना काटे (राष्ट्रवादी) ४२ हजार ५५३
२०१९ ची निवडणूक
- १) लक्ष्मण जगताप (भाजप) १ लाख ५० हजार
- २) राहुल कलाटे (अपक्ष) १ लाख १२ हजार
२०२३ ची पोट निवडणूक
- १) अश्विनी जगताप (भाजप) १ लाख ३५ हजार ६०३
- २) नाना काटे (राष्ट्रवादी) ९९ हजार ४३५
- ३) राहुल कलाटे (अपक्ष) ४४ हजार ११२
विधानसभा पोटनिवडणुकीतील मतदारांची आकडेवारी पाह पाहता एकूण मतदान 43,975 पैकी 23, 961 असे 53.12% मतदान झाले. तर प्रभाग 31 मध्ये एकूण मतदान 34,874 पैकी 17, 309 असे 49.63% मतदान झाले. भाजपच्या उमेदवार अश्विनीताई जगताप यांना 17,460 मतदान मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना 6,350 तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1327 मतदान मिळाले. याच भागात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप याना 10 हजाराचे लीड मिळाले.
या भागात 9 भाजपचे नगरसेवक आहेत तसेच जगताप पॅटर्न याचे महत्व मोठे आहे. विरोधात गेलेल्या मतदान आकडेवारी पाहता आगामी महापालिका निवडणुकांसाठी विरोधकांना वाट बिकट झाल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकात महाविकास आघाडी एकत्र येणार का? आली तर किती मतदान घेणार यावरती महापालिकेतील राजकीय गणिते ठरणार आहेत. त्यामुळे महापालिकेची लिटिल टेस्ट असणाऱ्या पोटनिवडणुकीतून महाविकास आघाडीसाठी भाजप विरोधात विरोधक कोणती व्ह्यू रचना आखतात यावरती महापालिकेची गणिते बरेच अवलंबून राहणार आहेत.




