पिपरी: निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पाच्या मागे असणाऱ्या हॉटेलच्या डिजिटल बोर्डामुळे शिल्पाच्या सौंदर्यास बाधा ठरत आहे. त्यामुळे हा डिजिटल बोर्ड तात्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी मधील भक्ती-शक्ती शिल्प म्हणजेच ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या स्मारकामागे असणाऱ्या तिरू हॉटेलचा ‘हॉटेल तिरू लॉज’ या नावाचा डिजिटल बोर्ड हा रात्रीच्या वेळेस स्मारकाच्या वरच्या बाजूस दिसत असून या डिजिटल बोर्डामुळे शिल्पाच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे, तरी या तक्रारीची दखल घेऊन सदरील डिजीटल बोर्ड हा तात्काळ हटविण्या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.



