पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील लोकमान्य हॉस्पिटल चौकात असलेल्या नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याठिकाणी असणाऱ्या नाल्यास लोखंडी जाळी नसल्यामुळे नागरिक कचरा आणून थेट नाल्यात फेकून देतात. याठिकाणी मनपाने बेंचेस टाकून नागरिकांना बसण्याची सोय केली आहे. सायंकाळी व सकाळी ज्येष्ठ नागरिक याठिकाणी बसतात. तसेच सकाळी व सायंकाळी फिरायला जाणारे, व्यायाम करणारे नागरिक आणि नोकरदार मंडळींची येथे वर्दळ असते. बहुतांश कंपन्यांच्या बसेस याठिकाणी थांबतात. या परिसरातून जाताना नागरिकांना दुर्गंधीचा सामाना करावा लागत आहे.
पाणी अडविल्यामुळे आणि वरचेवर साफसफाई न केल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांना याचाo त्रास होत असून आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते – चेतन गावडे




