कै. मधुकर पवळे उड्डाणपूल हा पिंपरी-चिंचवड शहरातील एक महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. अनेक वर्षापासून कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी सुशोभीकरण व रंगरंगोटी करण्यात आलेली नव्हती. भक्ती-शक्तीकडून येणारा रस्ता, पिंपरी -चिंचवड महापालिकेकडून देहूरोड व प्राधिकरणकडून येणारा रस्ता तसेच थरमॅक्स चौकाकडून येणारा रस्ता असे चारही रस्ते या ठिकाणी जोडले जातात. याठिकाणी नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. धूम्रपान करणाऱ्या मुळे अस्वच्छता निर्माण होते. मात्र सांप्रदायिक वारसा जपणारी चित्रे यांची उड्डाणपुलाला रंगरंगोटी व सुशोभीकरण केल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. त्यातच आता ही सांप्रदायिक चित्र मिटवून नागरिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी महापालिका प्रशासनाने घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकाकडून होताना दिसत आहे.
स्थानिकांनी काम थांबवले
निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल भिंतीवर महापालिकेने लाखो रुपये खर्च करून संत तुकाराम महाराज व सांप्रदाय दर्शन घडवणारी छायाचित्र रंगविली होती. त्याठिकाणी पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका बीआरटी प्रशासन यांच्याकडून पांढरा रंग लावून जाहिरातीसाठी पेंटिंग काम सुरू केले होते. त्या ठिकाणी ते पेंटिंग काम थांबवून विरोध करण्यात आला. स्थानिक भूमिपुत्र सचिन काळभोर, बंडू काळभोर, राजू काळभोर तसेच इतर व्यापारी वर्गाने विरोध दर्शविला.




