पिंपरी: पिंपरी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणावर पिंपरी फेस्टीवलचे आयोजन केले होते यामध्ये पिंपरीतील अबाल लहान मुले व महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या फेस्टिवलचे नियोजन युवा नेते ऋषिकेशदादा संजोग वाघेरे-पाटील युवा मंचच्या वतीने करण्यात आले होते.
पिंपरीत फेस्टिवलमध्ये बाल जत्रा, महिलांसाठी विविध खेळ, शाॅपिंग, खाऊ गल्ली तसेच फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या फेस्टिवलमध्ये मनोरंजन नगरीचे आयोजन करण्यात आले होते. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक महिलांनी व लहान मुलांनी याचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका उषाताई संजय पाटील व युवा नेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांनी केले होते.




