पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात H3N2 या विषाणूने संशयित रुग्णचा पहिला बळी घेतल्याचे समाेर आले आहे. एका 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
कोरोनानंतर देशावर आता नव्या विषाणूचं संकट आलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात या विषाणूने डोकं वर काढलं आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर महत्वाच्या शहरांमध्ये (H3N2) विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात ५ जणांना या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यापैकी चाैघांची प्रकृती स्थिर आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिक अनेक दुर्धर आजाराने ग्रस्त हाेते अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.




