लोणावळा : शिलाटणे येथील एका जखमी चिमुकल्या शिवभक्ताची प्राणज्योत मावळली. मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील शिवप्रेमींचा शिवजयंतीच्या दिवशी १० मार्चला शिवज्योत घेऊन येत असताना पहाटेच्या सुमाराला रावेत ताथवडे जवळील अपघातात ३३ जण जखमी झाले होते. यामध्ये एक मुलगा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर सोमाटणे येथील पायोनियर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
यामधील एक जखमी चिमुकला शिवभक्त कु आर्यन सोमनाथ कोंडभर ( वय १३) याला जास्त जखमी असल्याने याचे उपचारादर्म्यान गुरवारी सकाळी झुंज अपुरी पडली व त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे शिलाटणे गावात एकच कल्लोळ उडाला परंतू आज सहा दिवसानंतर देखील आज ही शिलाटणे गाव व परिसर दुःखाच्या छायेखाली आहे.
शक्यतो गावातील शालेय विद्यार्थी ह्या अपघातात जखमी झाले आहेत, तर पाच ते दहा मुले गंभीर जखमी झाले असून आजही तीन ते चार मुले अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.यामध्ये अनेक मुलांची शारीरिक अवयवांची तोड मोड झाली आहे.
या अपघातातील शिवभक्त रावेत येथील ओजस हाॕस्पिटल,सोमाटणे फाटा येथील पाॕयनर व पवना हाॕस्पिटलमध्ये ही मुले आजही उपचार घेत आहेत तर त्या मधील किरकोळ जखमी ५ ते ६ मुलांना उपचार घेऊन घरी सोडण्यात आले असून २० ते २५ मुले उपचार घेत आहेत




