पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील दिघी, तळवडे, निगडी, रावेत, किवळे यासह अनेक भागात केंद्रीय संरक्षण विभागाने रेडझोन क्षेत्र बाबत संशय निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रेडझोनचा सविस्तर नकाशा नव्याने प्रसिद्ध करावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत केली आहे.
संरक्षण विभागाच्या रेडझोन प्रश्नामुळे पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी वेगवेगळे नियम आहेत त्यामुळे नागरिकांना घरे बांधताना अथवा खरेदी करताना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. रेडझोन मध्ये जागा असल्याने बांधकाम करता येत नाही. तसेच बँका बांधकामासाठी कर्ज देत नाहीत. रेडझोनच्या संभ्रमामुळे नागरिकांमध्ये नाराज आहे. यामध्ये स्पष्टता यावी यासाठी शहरातील रेडझोनचा सविस्तर नकाशा प्रसिद्ध करावा अशी मागणी ठाकरे गटाच्या विभागप्रमुख सतीश मरळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली होती.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी महापालिका आयुक्त व संबंधित विभागाचे आदेश दिले होते. मात्र पुढे त्यावर काहीच कार्यवाही झाले नाही. नागरिकांच्या घराशी निगडित असलेला रेड झोनचा मुद्दा सचिन अहिर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. त्यांनी रेडझोन हद्दीचा सविस्तर नकाशा जाहीर करण्याची मागणी सभागृहात केली आहे.




