चिखली : पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयाची जनसंवाद सभा पार पडली. घरकुल वसाहतीमधील समस्या विषयी सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी वेगवेगळ्या तक्रारी मांडल्या.
यामध्ये भामा आसखेड धरणाची पाईपलाईनमुळे रस्ता खराब झालेला आहे, तो डांबरीकरण करून देणे बाबत प्रश्न विचारले. यावर पुढील काही दिवसात सदरचे काम मार्गी लागेल असे आश्वासन दिले. तसेच घरकुलमधील भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाविषयी तक्रार केली. वाढीव बिल आलेबाबतचे तक्रारीबाबत विचारणा केली असता सदर पाण्याचे काम घरकुलमध्ये चालू आहे नियोजन करण्यात येईल असे माहिती आधिकाऱ्यानी दिली.
तसेच घरकुलमधील ड्रेनेज लाईनबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित भागातील गटर तुंबले त्याचे काम चालू आहे असे सांगितले. शरदनगर मधील भुयारी मार्गात नेहमी वाहतूक कोंडी होऊन जाम होते त्यामुळे अपघात होत आहेत याबाबत विचारले असता याबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले




