अमेरिकेतून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. अमेरिकेतील एका खासगी शाळेत झालेल्या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसहित ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील एका खासगी नॅशिवल ग्रॅड शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शाळा परिसरातील ३ नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेत हल्लेखोर महिलेचा पोलिसांनी खात्मा केला आहे.
नेमकं काय घडलं?
अमेरिकेत सोमवारी एका हल्लेखोर महिलेने टेनेसी येथील नॅशिवल ग्रॅड शाळेत गोळीबार केला. तिने गोळीबार केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेने गोळीबार केल्यामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.
घटनेत ७ जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबार तीन चिमुकल्यांसहित तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत गोळीबार करणाऱ्या महिलेला पोलिसांनी गोळीबारात ठार केलं आहे. या घटनेत अशा एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे.




