पिंपरी, दि. २७ मार्च :- जागतिक क्षय रोग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण जनजागृतीपर कार्यक्रम दिनांक २४ मार्च २०२३ रोजी संपन्न झाला. आयुष्याच्या वाटेवर चालत असताना प्रत्येकाने आपल्या मोबाईल एवढच आपल्या शरीरावर देखील तितकेच लक्ष दिले पाहिजे. माणूस हा व्याख्यांचा समुछाय आहे. व्याख्या दुरुस्त झाली कि माणूस दुरुस्त झाला असे समजावे. शरीरासाठी व्यायाम तर मेंदूसाठी ध्यानधारणा करणे देखील महत्वाचे आहे. वेळात वेळ काढून प्रत्येकाने रोज व्यायाम, ध्यान केलं पाहिजे असे आवाहन डॉ. राजीव नगरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत डॉ. पवन साळवे यांनी केले क्षय रोग निर्मूलनाचे एकत्रितपणे काम करा असे आवाहन त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना केले. २०२५ पर्यंत क्षयरोग संपन्न करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, यामध्ये नागरिकांनी देखील सहभाग घेतला पाहिजे. क्षय रोगाबद्दल जनजागृती करताना खासगी डॉक्टरांनी देखील योगदान दिलं पाहिजे असे डॉ. किशोर खिलारे म्हणाले.
क्षय रोग संदर्भात अनेक समज गैरसमज रुग्णाप्रती चुकीची भावना या सर्वांमुळे रुग्णाचे मानसिक खच्चीकरण व जगण्याची उमेद संपून जाते. यासाठी जनजागृती करणा-या खाजगी रुग्णालय, खाजगी वैद्यकीय अधिकारी व संस्थांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामकाजा बद्दल प्रत्येक झोन मधील वैद्यकीय अधिकारी आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. वाय. सी. एम. मधील नर्सच्या समूहाने करूया जागर क्षयरोग मुक्तीचा हा पोवाडा सादर करून गीताच्या माध्यमातून जनजागृती केली.
यावेळी डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी तथा वैद्यकिय संचालक, डॉ. बाळासाहेब होडगर शहर क्षयरोग दुरीकरण अधिकारी, डॉ. अंजली ढोणे, क्षयरोग वैद्यकिय अधिकारी, शहर क्षयरोग दुरीकरण केंद्र तसेच स्टाफ नर्स, ए एनएम, आशा वर्कर, एन टी इ पी क्षयरोग अधिकारी व कर्मचारी, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, विविध सामायिक संस्था, एनजीओ, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, निक्षय मित्र यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर सरवदे, किशोर गवळी, रेशमा परब आणि आभार गोपाल कांबळे यांनी मानले.




