बोर्लीपंचतन येथे राधा-कृष्ण मंदीरासह विविध विकासकामांचं भूमिपूजन.
बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
सत्तेची नशा अतिशय वाईट, आतापर्यंत अनेक विकासकामं करत असताना आजवर अहंकाराचा स्पर्श कधी स्वतःला लागू दिला नाही. माणसाची कर्मच ही त्याची ओळख आहे.मी निरपेक्ष भावनेने कर्म करत गेलो.यश मिळत गेलं.अशा भावना रायगड रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनमधल्या प्राचीन राधाकृष्ण मंदीर जिर्णोध्दाराच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या. त्यांच्या खासदार निधीतून आणि श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदीती तटकरे यांच्या आमदार निधीच्या विविध योजनांतून बोर्लीपंचतन येथे होणाऱ्या कामांच्या भूमिपूजनासाठी शनिवार दि.२५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दत्त मंदीराची कमान,मारुती नाका ते नागाव मोहल्ला रस्ता,पोष्ट आॕफीस नाका ते मुस्लीम मोहल्ला रस्ता,बस स्थानक ते प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता,गणपती विसर्जन घाट कमान,कापोली येथील रस्ता अशा विविध कामांचं भुमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
बोर्लीपंचतन येथील प्राचीन राधाकृष्ण मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी आमदार आदिती तटकरे यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख तर जिल्हा नियोजन मंडळातून एकवीस लाख असा एकूण ३१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच त्याचं काम सूरु करुन सन २०२४ ते २०२५ या मंदिराच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या वर्षात दिमाखदार मंदीर बोर्लीवासीयांसाठी खूलं होईल असा विश्वास खा.तटकरे यांनी दिला.
महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून या विभागातील विकासकामांसाठी मंजूर केलेल्या निधीला नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. परंतू अजूनही या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे त्यामुळे त्यांच्याकडे दाद मागताच मंजूर विकासकामांच्या निधीला दिलेली स्थगीती हटवून न्यायालयाने या सरकारला चपराक दिली. त्यामुळे महाविकास आघाडी शासनाच्या काळात या विभागातील विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी लवकरात लवकर कसा उपलब्ध होईल यासाठी मी स्वतः,आमदार आदीती व विधान परीषद सदस्य अनिकेत सदैव प्रयत्नशील राहू असे म्हटले आहे.
या श्रीवर्धन मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात मानाचं स्थान मिळाल्याचंही खा.सुनिल तटकरे यांनी सांगितलं.याप्रसंगी सरपंच ज्योती परकर,ग्रामपंचायत सदस्य,राधाकृष्ण मंदिर समिती अध्यक्ष प्रज्योत सुर्वे, उपाध्यक्ष दयानंद तोंडलेकर, सचिव अभय पाटील, खजिनदार निशांत मोरे, गणराज पेठ खोती प्रमुख सुधीर तोंडलेकर,नाघेर गुजराती समाज बोर्ली पंचतन, दिवेआगर सरपंच सिध्देश कोसबे,उदय बापट,राष्ट्रवादीचे महंमद मेमन,सुकुमार तोंडलेकर,मंदार तोडणकर, सायली तोंडलेकर,स्वाती पाटील,नंदू पाटील,लिलाधर खोत,संतोष गायकर,अनंत कीर,शशीकांत सुर्वे,सुचिन किर,सुधाकर पाटील,शंकर मयेकर,सुजीत पाटील, संतोष मुरकर,महेश पिळणकर, सुशील पाटील,ग्रामस्थ व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमित पाटील तर प्रस्तावना प्रकाश पाटील यांनी केली.



