पिंपरी : एक एप्रिल हा “एप्रिल फुल” दिवस जगभरात एकमेकांना फ्रँक करण्यासाठी साजरा करण्यात येतो. मात्र देशात सामंत जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोट्या विकासाचा वादा वाढदिवस म्हणून पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींचा विकास म्हणजे फसवा असून, गेल्या आठ वर्षात ‘अच्छे दिन’च्या नावाखाली त्यांनी आणि भाजपने भारतीय जनतेला ‘एप्रिल फुल’ केले आहे, असा हल्लाबोल करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात एक एप्रिल हा ‘एप्रिल फुल’चा दिवस हा मोदीचा खोट्या विकासाचा वाढदिवस” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी “एकच भूल, कमळ का फुल, देशाला केले एप्रिल फूल” अशा विविध घोषणा देण्यात आल्या. माजी नगरसेवक राहुल भोसले, पंकज भालेकर, शाम लांडे, कार्याध्यक्ष फजल शेख,शहर प्रवक्ते विनायक रणसुंबे आदींसह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
भाजपच्या या ‘अच्छे दिन ‘ वर आमचे ‘पुराने दिन ‘च परत करा असं बोलू लागली आहे,” अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यावेळी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेरोजगारी, महागाईने जनतेला बेजार केले असून अशी परिस्थिती आजवरच्या भारताच्या इतिहासात कधीच नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मोदी आणि भाजपने तरुणांना एप्रिल फूल केले आहे. ना शिवस्मारक तयार झाले, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झालं, ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला, ना लोकांना पंधरा लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊदला फरफटत आणले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवरचे अत्याचार थांबले, ना डॉलर ४० रुपयांचा झाला, ना बाबासाहेबांचे स्मारक तयार झाले आणि ना अच्छे दिन आले! अशा प्रकारे पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीयांना एप्रिल फुल केले आहे. मात्र निवडणुकीत मतांच्या रूपाने भाजपला जनता नक्कीच ‘एप्रिल फुल’ बनवेल, असे युवक अध्यक्ष इम्रान शेख यावेळी म्हणाले.




