पिंपरी : नवी सांगवी येथील प्रमुख रस्त्याचे काम सुरू आहे. या परिसरातून पुणे शहराकडे जाणार्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र महानगरपालिकेने याच रस्त्याचे काम सुरु केले आहे. मात्र नागरिकांच्या सुरक्षेला हरताळ फासला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने नवी सांगवी मधील नागरिकांचा नागरिकांच्या अपघाताला सापळा लावला असल्याचे स्पष्ट दिसून येते.
या वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक एकच लोंखडी बॅरिकेटेड उभारला आहे. शेकडो मीटर खोदकाम करताना केवळ नाममात्र बॅरिकेटेड लावला आहे इतर जागेत साधी रेबिन लावून वाहनचालकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ सुरू ठेवला आहे. कोट्यावधी रुपयांची तरतूद असताना महानगरपालिकेला लोंखडी बॅरिकेटेड का लावता येत नाहीत असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
या भागाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाचे चारही माजी नगरसेवक करत होते. आता निवडणुका कधी होतील सांगता येत नाही त्यामुळे मतदारांसाठी कशाला ते प्रशासकिय अधिकार्यांना संपर्क करतील? तरी पालिकेने तातडीने बॅरिकेटेडची संख्या वाढवावी अन्यथा अंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदीप गायकवाड यांनी दिला आहे.




