सोमाटणे फाटा :- शिरगाव येथील गोपाळे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः सर्वस्व पणाला लावील असे प्रतिपादन विधासभेचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.त्यांनी बुधवारी (दि ५) रोजी शिरगाव येथील पिडीत गोपाळे कुटुंब यांच्या घरी भेट देवून सांत्वन केले.
शनिवारी (दि १) रात्री 9 च्या सुमारास शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांची तीन जणांनी धारदार शस्त्रानी वार करून हत्या केली होती. ही बातमी अजित पवार यांच्या कानावर गेल्याने त्यांनी आपले सर्व कामकाज बाजूला ठेवून शिरगाव येथे जावून मयत सरपंच यांच्या पत्नी,भाऊ,आई,यांची भेट घेवून सांत्वन केले आस्थेवाईकपणे चौकशी करून धीर दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि माझ्या परीने जे जे शक्य आहे ते ते मी तुमच्यासाठी करील आणि मारेकऱ्याना जास्तीत जास्त शिक्षा लागण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करील व या कुटुंबाला न्याय मिळवून देईल. यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उस्थित होते.




