पिंपरी – पिंपरी- चिंचवड भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातील मोबाईलवर ३० लाख रुपयांच्या खंडणीचा मागणी करणारा मेसेज आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
https://maharashtramaza.online/?p=164643
याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातील कर्मचारी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद देत आहे. आमदार महेश लांडगे यांनी विविध समस्या नागरिकांना मांडता याव्यात यासाठी एक माबाईल क्रमांक दिलेला आहे. या मोबाईलवर ३० लाख रुपयांची खंडणी मागणारा मेसेज आला आहे. त्यामध्ये महेश लांडगे यांचे नाव असून जिवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.




