वडगाव मावळ: आंदर मावळातील टाटा धरणात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि.५) एप्रिल रोजी घडली आहे. वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे.
अरुण धनंजय माने (वय २५ रा. कोल्हापूर) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदर मावळ भागात असणाऱ्या टाटा धरण ठिकाणी कोल्हापूर वरून काही तरुण पर्यटक फिरण्यासाठी वडेश्वर शिंदे घाटेवाडी येथे पर्यटनासाठी आले होते. तेव्हा त्यातील काही तरुण पोहण्यासाठी टाटा धरणात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील एका तरुण पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तरुणाचा शोध घेण्यासाठी अपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना शोधासाठी पाचारण करण्यात आले असून गुरुवार,(दि.६ ) त्याचा शोध घेतला जात आहे.




