पुण्यातील नेतेमंडळींना कोणत्यातरी गोष्टीत अडकवून त्यांना खंडणीसाठी फोन केला जातोय इतकंच नव्हे तर खंडणी न दिल्यास तुमचं पाँलिटिकल करिअरच बरबाद करु अशी धमकी दिली जात आहे. गेल्या महिनाभरात ज्या नेतेमंडळींना धमकी दिली जात आहेत यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड येथील भाजप आमदारांचा समावेश अधिक दिसून येत आहे. यामुळे भाजपमधील आमदार सायबर गुन्हेगारांच्या यादीत सर्वाधिक आहेत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नोटाबंदी तसेच कोविडनंतर देशात ऑनलाइन सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मोबाइल इंटरनेटचा वापर चैनीबरोबरच सोयीचाही झाला. मात्र दुसरीकडे सायबर क्राइमच्या घटनांमध्ये भिरमसाठ वाढ झाली. चिंतेची बाब म्हणजे सायबर क्राइम आणि त्याला बळी पडलेल्यांमध्ये जगात भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
भारतात ६८% यूझर्सनी डिसेंबर २०२२ पर्यंत कोणत्या ना कोणत्या ‘सायबर गुन्ह्याचा अनुभव घेतला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यानच्या अकल सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे.
महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक
सायबर विश्वातून होणारा पाठलाग अर्थात सायबर स्टॉकिंगमध्ये महाराष्ट्र २०२१ मध्ये देशात आघाडीवर होता. देशभरात सर्वाधिक प्रकरणे. महाराष्ट्रातून समोर आली होती.
■ महाराष्ट्रात आक्षेपार्ह डाटा व्हायरल, ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, लॉटरी घोटाळे, लैंगिक छळ, बँकिंगशी संबंधित गुन्हे आदीचे प्रमाण चिंताजनक आहे.
वाढते कॅशलेश व्यवहार, कोविडनंतर ऑनलाइन सेवांमध्ये झालेली वाढ याबरोबरच सायबर क्राइमचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले.




