पिंपरी : घरकुलच्या माध्यमातून नागरीकांचे घराचे स्वप्न साकार होत असून त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका विक्री अथवा भाड्याने देवु नये असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असुन या प्रकल्पातील ६ सोसायट्यांच्या इमारती मधील एकुण २५२ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत ०६ एप्रिल २०२३ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली.
त्यावेळी त्यांनी सर्वांना योग्य ते मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सहा. आयुक्त सुषमा शिंदे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, कनिष्ठ अभियंता शरद मोरमारे, कार्यालय अधिक्षक विष्णु भाट, कॉम्प्युटर ऑपरेटर सुनिता चौगुले पाटील, लिपिक योगिता जाधव
यांच्यासह झोनिषु विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच लाभार्थीसह सर्व उपस्थित होते. यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १४८ इमारत क्र. एफ-१३. सोसायटी क्र. १४९ इमारत क्र. एफ- १७. सोसायटी क्र. १५० इमारत क्र. डी- ८, सोसायटी क्र. १५१ इमारत क्र. डी-१२, सोसायटी क्र. १५२ इमारत क्र. एफ-१४ सोसायटी क्र. १५३ इमारत क्र. एफ-१८ या सर्व सोसायटी अध्यक्ष यांचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लाभार्थीनी आता हक्काचे व स्वतःचे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे, घराचा वापर स्वतः करावा, परिसर स्वच्छ ठेवावा, इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा राखावी व जतन करावे असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले. यावेळी सुषमा शिंदे सहा. आयुक्त यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हमे वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. कार्यालय अधिक्षक विष्णु भाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.




