वडगाव मावळ:- ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवानिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचा आखाडा शुक्रवारी (दि.७) वडगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या आखाड्यात मावळतालुका तसेच पंचक्रोशीतील पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आखाड्यातील कुस्त्यांसाठी ५० रुपये ते १० हजारापर्यंत इनाम ठेवण्यात आला होता.
यावेळी पंच म्हणून पैलवान मारुतराव ढोरे, भगवान पगडे , गोविंद ढोरे , रामभाऊ हिंगे, पंढरीनाथ ढोरे , सतीश तुमकर , भाऊसाहेब कराळे , अंकुश तुमकर, उमेश ढोरे आदींनी काम पाहिले. सूत्रसंचालन सुभाष जाधव यांनी केले यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर खजिनदार चंद्रकांत ढोरे सचिव अनंता कुडे, तुकाराम ढोरे, किरण भिलारे , राजेंद्र कुडे, विलास दंडेल, कार्यक्रमाचे संयोजन उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय दंडेल कार्याध्यक्ष सचिन कराळे, शिवाजी येळवंडे, कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब तुमकर, सचिव संतोष ढमाले, सहसचिव सोमनाथ धोंगडे, उपाध्यक्ष अनिकेत भगत, खंडू जाधव, संकेत चव्हाण, अक्षय रौंदळ, समीर ढोरे खजिनदार अनिल कोदरे सह खजिनदार सुधीर ढोरे कार्यक्रम प्रमुख सुहास विनोदे आदींनी केले,
सकाळी सात वाजता ज्ञान अमृत वारकरी शिक्षण संस्था आळंदी बाल भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला. रात्री नऊ वाजता बॉलिवूड नाईट स्ने अभिनेत्री माधुरी पवार ऑर्केस्ट्रा संपन्न झाला.




