कामशेत : वार्ताहर मावळ तालुक्यात कान्हे नायगाव येवलेवाडी व परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकरी व नागरिकांची चांगलीच दाणा दाण उडुन गेली या पावसाचा शेती पिकांना चांगलाच फटका बसण्याची भीती शेतकरी वर्ग दर्शवली जात आहे
या पावसाच्या वादळी वाऱ्याने नायगाव येथील वाघु चोपडे या फुल व्यवसायिकाला चांगलाच फटका बसलाय या वादळी वाऱ्यामुळे पॉलिहाऊस वर असलेला प्लास्टिकचा कागद फाटल्याने मोठे नुकसान झाले आहे
मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला त्यामुळे अनेक जणांची प्रारंभ उडाली काही भागात गारपीट झाली यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी आंब्याची व आंबे आलेल्या मोराची गळती झाली आहे
मावळ तालुक्यातील वडेश्वर येथील शिंदेवाडी गावातील ज्ञानेश्वर चिंधू काकडे यांच्या गोठ्यावर वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान झाले आहे तसेच जनावरेही किरकोळ जखमी झाले तरी संबंधित प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.




