पिंपरी : पिंपरी पवना सहकारी बँकेवर माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखालील पुन्हा एकदा सहकार पॅनलची एकहाती सत्ता आली आहे. पॅनलचे सर्वाच्या सर्व १७ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर, २ उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला.
बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. सर्वसाधरण गटातील १४ पुरुष, सर्वधारण गटातील २ महिला आणि अनुसूचित जाती-जमातील गटातील १ अशा १७ जागांसाठी मतदान झाले. लांडगे यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर सहकार पॅनल आणि पवना प्रगती यांच्यात लढत होती. सोमवारी मतमोजणी पार पडली. सहकार पॅनलचे सर्व १७ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
पवना बँकेच्या सत्ताधारी पॅनेल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे यांना सर्वाधिक मते मिळाली, पॅनलमधील इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दोडकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी विजयी उमेदवार घोषित केले.
विजयी उमेदवार….
लांडगे ज्ञानेश्वर पांडुरंग ३१५५
काळभोर विठ्ठल सोमजी ३१०८
गराडे शांताराम दगडू २८८५
काटे जयनाथ नारायण ३०२४
गावडे अमित राजेंद्र ३०९३
फुगे शामराव हिरामण २९९४
वाघेरे शिवाजी हरिभाऊ ३०४८
काळभोर शरद दिगंबर ३०७७
लांडगे जितेंद्र मुरलीधर २९८५
चिंचवडे सचिन बाजीराव ३०३१
काळभोर सचिन ज्ञानेश्वर ३०५३ –
गावडे चेतन बाळासाहेब ३०५० –
गव्हाणे सुनील शंकर ३०४९
नाणेकर बिपीन निवृत्ती ३०१३ –
महिला राखीव गट-गावडे जयश्री वसंत २९५७
काळभोर ऊर्मिला तुळशीराम ३०११
अनुसूचित जाती / जमाती गट- डोळस दादू लक्ष्मण ३०७४




