मुंबई : राज्यात सत्तासंघर्षावरून राजकारण तापलेले असतानाच १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील कोर्लईतील कथित १९ बंगल्याप्रकरणी पहिली अटक कोर्लई गावचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्याप्रकरणी ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन ग्रामसेवक, कोर्लई गावचे माजी चार सरपंच, अशा सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१९ बंगल्याचे कनेक्शन ठाकरे कुटुंबाशी आहे, असे कथित आरोप होते. मात्र एफआयआरमध्ये ठाकरे कुटुंबातील कुणाचेही रितसर नाव नाही आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचे नाव उद्धव ठाकरे परिवाराशी जोडले होते. मात्र या सात जणांपैकी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे. पुढील लोकांची देखील चौकशी सुरू आहे.


