भोसरी: अण्णासाहेब मगर बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनेलने सहकार पॅनेलचा धुवा उडविला. निवडणुकीसाठी उभे असलेल्या प्रगती पॅनेलच्या १५ पैकी सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीत बाजी मारली. त्यामुळे प्रगती पॅनेलचे नंदू लांडे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविली आहे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड व ठाणे येथे कार्यक्षेत्र आहे. निवडणूक चुरशीची झाली. बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा असताना गावकी भावकीच्या वादात निवडणुकीचे मैदान चांगलेच गाजले. १० ते १५ हजारांच्या घरात सभासद संख्या आहे. प्रमुख चौकांत फ्लेक्स लावले होते. निवडणुकीत नंदकुमार लांडे यांचे प्रगती पॅनेल तर विठ्ठल सांडभोर यांचे सहकार पॅनेल रिंगणात होते. निवडणुकीत सहकार पराभूत झाले. निकालानंतर बँकेसमोर विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
नातेसंबंध आणि गावकी भावकीचे राजकारण बँक निवडणुकीत पथ्यावर
महापालिका विधानसभा यांचेही राजकारण फिरत असते. त्यामुळे या निवडणुकीला बरेच महत्त्व आहे. शहरातील राजकारण गावकी भावकी आणि नातेसंबंधांवर अधारित आहे. नेमके हेच मगर बँकेच्या निकालातून समोर आले आहे. निकाल जाहीर होताच विजयी झालेल्या उमेदवारांनी लांडेवाडीतील निवडणूक केंद्रावर प्रचंड जल्लोष केला.
सहकार क्षेत्रामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब मगर बैंक उल्लेखनीय काम करत आहे. अण्णासाहेब मगर बँकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांना मतदारांनी दिलेले उत्तर म्हणजे आमचा विजय आहे. बँकेने केलेली प्रगती आणि आमच्या प्रामाणिकपणाला सभासदांनी न्याय दिला. आम्हाला यश मिळाले त्याबद्दल सदस्यांचे आभार. – नंदकुमार लांडे, माजी चेअरमन व प्रगती पॅनल प्रमुख.
विजयी उमेदवार आणि मते
चेतन सीताराम आहेर (२११८),
रामदास आनंदा काळजे (२०१८),
विजय बाजीराव गवारे (२१०३),
राजाराम रामचंद्र ढेरंगे (१९९३),
अमेय सदानंद दवे (१८८७),
गणेश तुकाराम पवळे (२०४२),
संतोष रामदास भांगरे (१९७३),
सोनल राहुल लांडगे (२०६७),
नंदकुमार विठोबा लांडे (२१४९),
राजेश दत्तात्रय सस्ते (२०७०),
राजश्री हुलावळे (२१४४),
सुगंधा लांडे (२१४८),
इतर मागास प्रवर्ग : मनोज बोरसे (२२०५),
भटक्या जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग : शंकर मेटकरी (२११६)
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दीपक डोळस (२२१७)




