पिंपरी, ११ एप्रिल :- वाहन चोरीच्या गुन्हयांचा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा हे समांतर तपास करीत होते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार चाकण एमआयडीसीतील मर्सडिज कंपनीच्या मागील बाजुस पोलिसांनी सापळा लावला. दोघा सराईत वाहनचोरांना अटक केली. त्यांच्याकडून १३ दुचाकी वाहने जप्त केली.
प्रतिक दत्तात्रय भालेराव (वय ३१ वर्षे रा. सध्या भाऊसाहेब बोबडे यांचे खोलीत, सिध्दीविनायक नगर, कडाचीवाडी, चाकण, मुळगाव- कंदळी वडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), संदीप रामचंद्र ढोंगे (वय २७ वर्षे रा. सध्या. शिंदे यांचे खोलीत, सिध्दीविनायक नगर, कडाचीवाडी, चाकण, मुळगाव-मु. सावळा, पो.खांडी, ता. मावळ, जि.पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात १७६ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दोघांनी गुन्हयातील दुचाकी वाहनं पिंपरी एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी तसेच रांजणगाव एमआयडीसी, पुणे ग्रामीण या भागातुन आणखी दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितले. दोघांना ५ दिवस पोलीस कस्टडीत घेतले. कस्टडी दरम्यान तपास करुन त्यांच्याकडुन ५,०५,००० रुपये किंमतीच्या १३ दुचाकी वाहने व २ मोबाईलफोन हस्तगत करुन, चाकण पो.स्टे. कडील ३ गुन्हे, पिंपरी पो.स्टे. कडील २ गुन्हे, महाळुंगे एमआयडीसी पो.स्टे. कडील १ गुन्हे, सांगवी पो.स्टे. कडील १, तळेगाव दाभाडे पो.स्टे. कडील १ व रांजणगाव पो.स्टे. पुणे ग्रामीण कडील १ गुन्हे, असे एकुण ९ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी.अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.




