पिंपरीः किवळे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून संरक्षणसाठी टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये पाच जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थाळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाने बाहेर काढले. सहा क्रेनच्या साह्याने हे होर्डिंग बाजुला करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात आज संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. किवळे येथे आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांना होर्डिंगचा आडोसा घेतला. मात्र, वादळामुळे अचानक हे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती आहे.

यामध्ये आज दिनांक १७/०४/२०२३ रोजी १७:१५ वा ते १७:३० वा चे दरम्यान झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे रावेत पो.स्टे हद्दीत बेंगलोर – मुंबई हायवे, किवळे ओव्हर ब्रिज जवळ, सर्व्हिस रोड लगत शार्वी हॉटेलचे जवळ असलेला जाहीरातीचा होर्डींग पक्चरचे दुकानावर पडुन दुकानात निवा-यासाठी थांबलेल्या लोकांचे अंगावर पडल्यामुळे त्यामध्ये मृत व जखमी झालेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे.
जखमी व्यक्तीचे नाव पत्ता
१) विशाल शिवशंकर यादव वय २० वर्षे रा- उत्तरप्रदेश
( पंक्चर दुकानवाला)
२) रहमद मोहम्मद अन्सारी वय २१ वर्षे रा- शार्वी हॉटेलजवळ, किवळे पुणे. ( पंक्चर दुकानवाला)
३) रिंकी दिलीप रॉय वय ४५ वर्षे रा- थॉमस कॉलनी देहुरोड पुणे.
मृत व्यक्तीचे नाव पत्ता
१) शोभा विजय टाक वय ५० वर्षे रा- पारशी चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ पुणे.
२) वर्षा विलास केदारी वय ५० वर्षे रा- गांधीनगर देहुरोड पुणे.
३) रामअवध प्रल्हाद आत्मज वय- २९ वर्षे रा- पिपारा सोहत, लक्ष्मीपुर रेजमहाराज गंज उत्तरप्रदेश.
४) भारती नितीन मंचक वय ३३ वर्षे रा- शितळादेवी मंदीराजवळ, मामुर्डी पुणे.
५) अनिता उमेश रॉय वय- ४५ वर्षे रा- थॉमस कॉलनी देहुरोड पुणे.




