पिंपरी : तीन वर्षांपूर्वी पुण्यातील जुन्याबाजाराजवळ होर्डींग कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती आज १७ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड येथील किवळे परिसरात झाली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर तिघे जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन यांच्या मदतीने घटनेची वस्तुस्थिती जाणून घेतली.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी सहाच्या सुमारास किवळे परिसरात सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस सुरू झाल्याने काही व्यक्तींनी एका मोठ्या होर्डींगनजिक आसरा घेतला. वा-याच्या जोरामुळे होर्डींग कोसळले. त्याखाली एकंदर पाच जण सापडून त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला व एका पुरुषाचा समावेश असल्याचे समजते. तर, दोन पुरुष आणि एक महिला जखमी झाली असल्याचे समजते.
Uपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे देहू-कात्रज मार्गावर रस्त्याच्या कडेला उभारलेले मोठे होर्डिंग अचानक कोसळले आणि अनेक लोक त्याखाली अडकले. त्यानंतर झालेल्या गोंधळात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर तीन जण जखमी झाले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून जेसीबीच्या सहाय्याने होर्डींग बाजूस करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हे होर्डींग अधिकृत होते की अनधिकृत असाही प्रश्न निर्माण झाला असून याची छाननी केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
- नाना काटे घटना स्थळी तात्काळ दाखल…..

पिंपरी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एक लाखाहून अधिक मतदान घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आपल्या मतदारसंघात झालेल्या घटनेची माहिती भेटताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विद्यमान लोकप्रतिनिधी येण्यापूर्वीच नाना काटे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यांनी पोलीस प्रशासनाकडून माहिती घेत जखमींना रुग्णालयात हलवण्याबाबत व नागरिकांना दिलास देण्याचे काम केले.




