
आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची सज्जता तपासण्यासाठी अग्निशमन विभागाने शहरात दोन ठिकाणी अग्निशमन विभागाचे मॉकड्रिल पार पडले. सकाळी पहिल्या शिफ्ट मधील अग्निशमन विभागाचे जवान कामावर हजर झाले. त्याच वेळी अचानक अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षातील फोन खणाणला.
एल्प्रो मॉल, चिंचवडगाव येथे आग लागली असल्याची वर्दी मिळाली. अन पिंपरी, थेरगाव अग्निशमन केंद्रातील बंब एल्प्रो मॉल मध्ये दाखल झाले. मॉल मधील अग्निशमन यंत्रणा जवानांनी तपासून पाहिली. तसेच आगीची वर्दी मिळाली त्या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर हे मॉकड्रिल असल्याचे निदर्शनास आले.
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिंचवडगावात एल्प्रो मॉल आहे. मॉलमध्ये शेडको दुकाने असल्याने तिथे दररोज हजारो नागरिक भेट देत असतात. (Pimpri) आगीसारखी घटना घडल्यानंतर यंत्रणा कशी काम करेल, याचे प्रात्यक्षिक या मॉकड्रील द्वारे घेण्यात आले.
दुपारी तीन वाजता पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिका भवनात आग लागली अशी माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. दरम्यान महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. चौथ्या मजल्यावर एक अभिभागातून धूर देखील येत असल्याचे दिसत होते दरम्यान अग्निशमन (Pimpri) विभागाच्या जवानांनी आग विझवण्याची यंत्रणा सज्ज केली. काही वेळातच ही आग नसून मॉकड्रिल असल्याचे लक्षात येतात सर्व कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.




