
केवळ कठडा नसल्यामुळे बस दरीत कोसळून (Pune) 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली असून बोरघाटातील त्या वळणावर अखेर प्रशासनाने लोखंडी कठडा बसवला आहे.
या अपघातात उतारावरून बस येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कठडा नसल्याने बस थेट 200 फूट खोल दरीत कोसळली होती. पुणे-मुंबई महामार्गावर वाढती वाहतूक व टोल वाचविण्यासाठी अनेक जण बोरघाटातील रस्त्याने वाहतूक करत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न अल्याने असे अपघात वारंवार घडत आहेत.
या अपघातानंतर थेट मुख्यमंत्री यांनीही घटनास्थळी भेट देत संरक्षक कठडा बसवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार अखेर कठडा बसवला असून यापुढे असे अपघात होणार नाही याची काळजी घेणार असल्याची हमी प्रशासनाने दिली आहे. मात्र एका कठड्या अभावी 13 जणांना प्राण गमवावे लागल्याची खंत कायम मनात राहणार आहे.




