..तर आर. आर. पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री झाले असते
पिंपरी : राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळाले असते तर आर. आर पाटील मुख्यमंत्री झाले असते. परंतु ती संधी मिळाली नाही. आता २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपद करण्याची तयारी असल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केले आहे.
अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या.
काँग्रेसची लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर. आर. पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असं त्यांनी सांगितले.




