पिंपरी (प्रतिनिधी)- आरटीई प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची योग्य पूर्तता करण्यास पालकांनी विलंब केला आहे. प्रवेशाची मुदतही संपली आहे. मुदत संपल्याने कागदपत्रांअभावी बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. ८ मे पर्यंत पालकांनी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन शिक्षण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काही विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र, दाखले उपलब्ध नाहीत. तसेच घरच्या पत्त्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता नाही. बऱ्याच पालकांकडे रजिस्टर नोंद असलेल्या भाडे करारनाम्याची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत नंबर लागूनही केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे प्रवेश धोक्यात आले आहेत. या बाबत शहरातील पालकांकडून काही दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रांची जुळवाजुळव केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने मुदत वाढ दिली आहे.
आरटीईची सोडत झाल्यानंतर प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मात्र काहीना काही अडथळे आल्याने पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घेता आलेला नाही. प्रवेशाचा अर्ज करताना संकेतस्थळ बंद पडणे, प्रवेशाची यादी जाहीर करण्यास विलंब या कारणामुळे प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. सध्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पडताळणी समिती नेमण्यात आली आहे. कागदपत्रांच्या अनेक चुका या पडताळणी समितीच्या निदर्शनास येत आहे.
पालकांकडे पाल्याचे एखादे कागदपत्रे उपलब्ध आहे, दुसरे नाही. काही विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र, दाखले उपलब्ध नाहीत. तसेच घरच्या पत्त्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता नाही. बऱ्याच पालकांकडे रजिस्टर नोंद असलेल्या भाडे करारनाम्याची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत नंबर लागूनही केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे प्रवेश धोक्यात आले आहेत. या बाबत शहरातील पालकांकडून काही दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रांची जुळवाजुळव केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने मुदत वाढ दिली आहे.




