यातील अडचणीसाठी पालिका प्रशासन व मुळ जमीन मालक हिरामण कापसे यांच्यात योग्य समन्वय साधत कापसे यांना योग्य मोबदला मिळावा जेणेकरून रस्त्याचे रखडलेले काम लवकर चालु होईल अशी विनंती नाना काटे यांनी पालिका प्रशासनास केली. या सर्व विनंतीला व पाठपुराव्याला पालिका प्रशासन तसेच हिरामण कापसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज अखेर रस्त्याचे काम सुरु झाले.
हा रस्ता हा 12 मीटरचा असून या कामास 3 कोटी 9 लाख रुपये एवढा निधी मंजुर झाला आहे. प्रशस्त अश्या रस्त्याच्या एका बाजुला प्रशस्त फुटपाथ व दुसऱ्या बाजुला ऍटग्रेड तसेच दोन्ही बाजूस अत्याधुनिक एलईडी पथदिवे, नागरिकांसाठी उत्तम अशी बैठक व्यवस्था असे नियोजन करण्यात येणार आहे.
या रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी संबंधित रस्त्याचे ठेकेदार मे.पृथ्वी एन्टरप्रायझेसचे विजय पवार, इंजिनिअर दलित कांबळे, सोसायटी सभासद दीपक कोठावडे, अंकित सिंग, किशोर पाटील, सावन मेहता, हेमराज लांडे, धनंजय मागरूळकर, अमित मालपुरे, प्रशांत देशपांडे, रॉबिन कायस्थ, ज्ञानेश कवाडे, भूषण नेरकर, मयंक अवधिया, मुकुल कामत, अमन कामत तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचा प्रश्न सुटल्याबद्दल नागरिकांनी नाना काटे यांचे आभार मानले.




