जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठामध्ये मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाचे उद्घाटन
चिखली : पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, पाटीलनगर, टाळगाव चिखली येथे गुरुवारी दिनांक. ४/५/२०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता. मुक्त सांप्रदायिक शिक्षणाचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
मुक्त सांप्रदायिक शिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका तथा अध्यक्ष, जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, मा शेखर सिंह. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे असणार आहेत.
सदर उद्घाटनासाठी श्रीरंग बारणे (खासदार-मावळ), महेशदादा लांडगे ( आमदार भोसरी ), अमोल कोल्हे (खासदार-शिरूर), श्रीमती आश्विनीताई जगताप (आमदार चिंचवड ), मा. आण्णा बनसोडे (आमदार पिंपरी), उमाताई खापरे (आमदार विधानपरिषद), पुरुषोत्तम महाराज मोरे (अध्यक्ष, श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू), योगेश देसाई (प्रमुख विश्वस्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्रीक्षेत्र आळंदी), मंदार महाराज देव (मोरया गोसावी ट्रस्ट, श्री क्षेत्र चिंचवड), प्रदीप जांभळे पाटील (अतिरिक्त आयुक्त १, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) संतपीठ संचालक मंडळ, सांस्कृतिक, चिंतन, अभ्यासक, व सल्लागार समिती, सर्व आजी माजी महापौर, नगरसेवक उपस्थिती लाभणार आहे.
जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठा अंतर्गत मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण वय वर्ष १२ ते ६० यावयोगटातील सर्व महिला व पुरुषांना मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सांप्रदायिक भजन, गायन, पखावज, तबला, टाळ वादन, कीर्तन, प्रवचन व संत साहित्याचा अभ्यासक्रम आदींचे मुक्त शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन संतपीठाचे अध्यक्ष, शेखर सिंह, सचिव मा. श्री. संजय नाईकडे तसेच सर्व सन्माननीय संचालकांच्या माध्यमातून आयोजित करणेत आलेले आहे. सदरची माहिती संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे व डॉ.स्वाती मुळे यांनी दिली.




