पिंपळे सौदागर : महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जातो. पिंपळे सौदागर येथील पि. के इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ काटे आणि प्रमुख पाहुणे संजय भिसे व सौ.कुंदाताई संजय भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाचे अनावरण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली. या लढ्यातून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे ओळख निर्माण केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. असे मत संजय भिसे यांनी बोलताना व्यक्त केले.




