सांगवी : शहरात कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील दगड अथवा शस्त्रे, अस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे अथवा बाळगण्याबाबत मनाई आदेश आहे.
या आदेशाचा भंग करुन आरोपीने देशी बनावटीचे दोन पिस्टल, ४ जिवंत पितळी राउंड जवळ बाळगले. सांगवी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. (दि. २) रोजी २.०० ते २.२० च्या सुमारास रक्षक चौक ते पिंपळे निलखला जाणाऱ्या वळणाच्या रोडवर कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८४,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सांगवी पोलिसांनी २०४/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) (२७) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. राम परशुराम पाटील (वय २९ वर्षे रा. शिवशोभा बिल्डीग, जयमल्हार कॉलनी नं ६, थेरगाव; मुळ गाव टाकळी, ता. उदगीर, जिल्हा लातुर) असे अटक आरोपीचे नाव आहे.




