हिंजवडी : पुणे जिल्हयाचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्यपदी भारती राजेंद्र विनोदे यांची निवड करण्यात आली. मा. मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते विनोदे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी भारती राजेंद्र विनोदे यांच्यासह संदीप भोंडवे, राजेंद्र शिळीमकर आणि तानाजी शिंगाडे यांची देखील जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
प्राध्यापक भारती विनोदे अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय कार्य करत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिलेल्या संधीच सोन करत त्यांनी विद्युत वितरण समितीवर आपल्या कामाचा ठसा उमठविला आहे. त्यांनी भाजपा महिला कार्यकारिणीच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी व भाजपा मुळशी तालुका प्रभारी म्हणूनही काम करत आहेत. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राची जाण असल्यामुळे भारती विनोदे यांची महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आले.




