पिंपरी :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिंपरीगाव आणि काळेवाडी येथील लेजेंडस् चॉईस व जीटी या दुकानात दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीचे स्वामीत्व असलेल्या NIKE & UNDER ARMOUR कंपनीचे उत्पादन असलेले कपडे विक्रीस ठेवले.
पहिल्या दुकानात २,७०,४०० रूपये किंमतीचे एकुण ३९० नग बनावट टि शर्ट, शॉर्ट पॅन्ट व ट्रॅकपॅन्ट विक्रीस होते. तसेच जीटी दुकानात १,५९,९०० रुपये किंमतीचे एकुण ३६७ नग बनावट टि शर्ट, सॅन्डो टी शर्ट, शॉर्ट पॅन्ट व ट्रक पॅन्ट असे दोन्ही दुनाकात एकुण ७५७ नग विक्रीस ठेवले. दोन्ही वस्तूंची किंमत ४,३०,३०० रुपये एवढी आहे.
हा प्रकार (दि. ३) रोजी दुपारी २.१० च्या सुमारास सी ब्लॉक ३/१, पिंपरी येथील लेजेंडस् चॉईस व जीटी या दुकानात उघडकीस आला. फिर्यादी महेश विष्णु कांबळे (नवी दिल्ली; मुळ राहणार शिवाजीनगर, पुणे) यांनी आरोपी आमीर करीम शेख (पिंपरीगाव), पियुष राम तेलवानी (नढेनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ४९६ / २०२३, कॉपीराईट अॅक्ट सन १९५७ चे कलम ५१.६३.६४ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.




