पिंपरी : भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड कमिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे सामूहिक बुध्द वंदना घेउन तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भीमशक्ती विद्यार्थी आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज गायकवाड, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष श्री. परमेश्वर निसरगंध, सामाजिक कार्यकर्ते गौतम गायकवाड, भीम शक्ति विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर संघटक विशाल केंगार, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष श्री. शुभम कांबळे, पिंपरी चिंचवड शहर सचिव श्री. सिद्धू कांबळे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्री. अजय शेरखाने, भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहराचे नेते लहू साळुंखे, अमोल शिनगारे, लक्ष्मण कुलाली, बसवा मगी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अभिवादन करताना भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज गायकवाड म्हणाले की, बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष सहजपणे स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या बौध्द धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. त्यामुळेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह बुध्द धम्म स्वीकारला. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समानता, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे तत्त्वज्ञान ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ आहे




